31/10/2024

Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत Chakli

Recipe for Chakli: दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा 2024 special



2024 faral recipe for Diwali: दिवाळीचा फराळ करण्याची वेळ झाली आहे. दिवाळसणाला खमंग, खुसखुशीत चकलीची आठवण सगळ्यांनाच येते. चकलीची भाजणी आणि कधीही बिघडणार नाही, अशी चकली करायची असेल तर ही कृती नक्की फॉलो करा. आधी चकलीची भाजणी कशी करायची ते पाहुयात आणि त्यानंतर त्याच भाजणीपासून चकली कशी करायची तेही पाहुयात…अनेक महिलांच्या दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या नेहमी नरम पडतात. पण आता घाबरू नका आधी ही माहिती वाचा. खाली दिलेलं भाजणीचे योग्य प्रमाण वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली. दिवाळीला सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे चकली पण काही वेळा चकली बिघडते कारण भाजणीचे प्रमाण योग्य नसते कोणतातरी पदार्थ जास्त होतो म्हणून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भाजणीचे योग्य प्रमाण वापरून खमंग खुसखुशीत चकलीकशी बनवायची.

chakli recipe


३ वाट्या साधे तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
दीड वाटी हरभऱ्याची डाळ
अर्धी वाटी मूग डाळ
पाऊण वाटी धणे
१ वाटी पोहे

२ टेबल स्पून जिरे



चकलीची भाजणी कशी करायची?

सर्वात आधी वर दिलेले सर्व धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत.

सर्वप्रथम तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजू नयेत. किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा.

हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी. त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी. साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा.

मग मूगडाळ भाजावी. त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत. पोहे भाजणं अर्ध्यावर आले असतानाच त्यात धणे टाकावेत. थोडावेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावेत.

भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात २ टेबलस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी. या भाजणीत ४० ते ५० मध्यम आकाराच्या चकल्या होतात.
chakli



कुरकुरीत चकलीची रेसिपी

सुरुवातीला २ वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली करुयात. एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, अर्धा टेबलस्पून तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून ओवा, १ टेबलस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, २ टीस्पून तूप टाकावे.

या पाण्याला उकळी आली की २ वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी. गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर हे १ तासभर झाकून ठेवावे. तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात तो मऊसर भिजवून घ्यावा. चकली करण्याचं यंत्र म्हणजेच सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं.

त्यात हे तयार केलेलं पीठ टाकावं. मध्यम आकाराच्या चकल्या बटरपेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात.

त्यानंतर कढईत तेल घ्यावं. भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्यात चकली तळून घ्यावी. दोन वाटी मिश्रणात साधारण १५ ते १६ चकल्या आरामात होतात.

No comments:

meenaj food recipe

Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत Chakli

Recipe for Chakli: दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा 2024 special 2024 faral recipe for Diwali: दिवाळीचा फ...